• NAME:-

  VASANT VITTHALRAO BHISEKAR
 • EMAIL:-

  nanabhisekar@gmail.com
 • MOBILE:-

  9822006191
 • ADDRESS:-

  A-3, 510, RAHUL EAST VIEW, DHERE COMPANY ROAD, KALEPADAL, HADAPSAR, PUNE 411028

Subject:-

Trying to conserve social forest.

Story:-

सन्माननीय  महोदय,
    मी वसंत वि भिसेकर, मार्च २०१९ पासून शासकीय सामाजिकवनक्षेत्र सर्वे क्र.६०/६१ (एकूण क्षेत्रफळ २६एकर )मध्ये वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करीत आहे. जंगली ससे, तितर, गवताळ पक्षी यांचे अधिवास येथे आहे. क्षेत्राची सीमा भिंत ७ फूट उंच आणि एक कि. मी. लांब आहे. वृक्ष संवर्धन करीत असताना येणाऱ्या अडचणींची कल्पना वेळोवेळी मोबाईल वर देण्यात आलेली आहे.ज्या खालील प्रमाणे आहेत- १) दक्षिण दिशेला जवळपास ३२ फूट जागेवर सीमा भिंत बांधलेली नाही. भव्य प्रवेशद्वार खासगी कुलुपाचे नियंत्रण आहे. सीमा भिंत नसलेली जागा आणि प्रवेश द्वार च्या माध्यमातून दिवस-रात्र स्थानिक लोकांची वर्दळ असते. समाज कंटकांवर कुणाचेही नियंत्रण नाही. २) जमीनीवर बांधलेल्या दोन मोठ्या टाक्यांचे नळ समाज कंटकांनी तोडून टाकले आहेत. ३) विनंती ला मान देऊन बोर मध्ये सबमर्सीबल पंप बसवून वीजपुरवठा करण्यात आला होता मे २०२० पासून वीजपुरवठा बंद आहे. ४) मी स्वतः माझ्या टेरेसच्या रोपवाटिकेत तयार केलेली काटेसावर, चारोळी, बेल, अंकोल, काळाकूडा, पळस, बहावा इत्यादी देशी वृक्षांची लागवड केली होती त्यातील काही रोप लोकांनी चोरुन नेली. काही रोप वनात चरायला येणाऱ्या गायी आणि म्हशींच्या पायदळी तुडवली गेली. उरलेली रोपे या पाच ते सहा दिवसात वणव्यात जळून गेली. माझा दहा सदस्यांचा गृप आहे. शासनाने लागवड केलेल्या आणि आम्ही लागवड केलेल्या रोपांच्या संवर्धना साठीचा खर्च आम्ही आपसात वर्गणी करून करीत असतो. ५) ४०×४० फूटी शासकीय हौद जी पावसाळ्यात पण कोरडीच असायची. रीतसर लेखी संमती घेऊन हौदाच्या अलीकडे श्रमदान करून पाच फूट उंच व पन्नास फूट लांब पाणवठा आम्ही स्वतः तयार केला व हौदात पाणी सोडले. त्या हौदाच्या भिंतीला कुणी तरी भगदाड पाडले आहे. माझी तक्रार संबंधित अधिकारी/कर्मचारी जे माहिती मिळून देखील उदासीन राहिले किंवा शासनाचे काही जाचक निर्णय/नियम असतील ज्या अंतर्गत त्यांना गप्प बसावे लागले त्या सर्वांच्या विरोधात आहे. मला पूर्ण खात्री आहे की आपण जातीने लक्ष घालून हा विषय मार्गी लावणार. आम्ही उमेद सोडलेली नाही. आम्ही वृक्ष सेवा अविरतपणे करत आहेत. अशा हीच की आमची कर्म भूमी जी घनदाट वृक्षांनी बहरलेली असेल, बघायला केंव्हा मिळेल. माझे वय ६३ आहे, ह्याची देहा ह्याची डोळा मला बघायला मिळेल हीच अपेक्षा...

Download attachment-

Attached images